बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढील अनेक दशकांपर्यंत देशाच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व राहणार”

मुंबई | प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारविरूद्ध मोर्चा उघडला आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांचं समर्थन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजयी झाला होता. अशातच आता प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

येत्या अनेक दशकात भारताच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी चुक आहे, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे भाजप मोदी लाट असेपर्यंत सत्तेत राहणार आहेत या भ्रमात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेसच्या किंमतीमध्ये वाढ झाली तरी देखील जनआक्रोश निर्माण झाला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांची ताकद समजली पाहिजे असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलंय. काही मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवू शकतो, असं मानणं देखील मोठी चूक असू शकते, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, 2014 साली प्रशांत किशोर नरेंद्र मोदी यांचे निवडणूक रणनितीकार होते. नोटबंदीनंतर प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या कामावर टीका करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर प्रशांत किशोर काँग्रेससोबत मिळून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांनाच चकित केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”

“राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More