भाजपाच्या शेवटाची सुरुवात झाली आहे- छगन भुजबळ

पुणे | भाजपने 2014च्या निवडणुका विकास या शब्दाला घेऊन लढवल्या होत्या. मात्र तो विकास कुठे गेला? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी विचारला आहे. भाजपच्या शेवटाची कालपासून सुरुवात झाली आहे, असाही दावाur त्यांनी केला आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि भुजबळ यांनी आज एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहता त्याचे सावट आगामी निवडणूक काळात दिसतील आणि भाजपची सत्ता जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपची उलटी गिणती सुरु झाल्याचंही कुशवाह यांनी सांगितलं. आम्ही स्वतंत्र लढू, दुसऱ्या महाआघाडीत जाऊ किंवा तिसऱ्या आघाडीत जाऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या 

-मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ‘कमल’ फुलणार; कमलनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब?

-राहुल गांधीना पप्पू म्हणण्यापूर्वी आता किमान 10 वेळा विचार करा!

-खरं खरं सांगा, खरा फेकू कोण??? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं