Top News राजकारण

“फायद्यासाठी बिहारमध्ये दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता”

औरंगाबाद | बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

औरंगाबादमधील एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना, बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता असा आरोप त्यांनी भाजपवर लावला आहे.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपचा डाव होता. पण हा भाजपाचा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही. एनडीएला बिहार विधानसभेत काटावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही.”

“बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी सभा घेतल्या असून सभेला 10 हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे. कोरोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं नागरिकांनी सांगितलं होतं. मग अशावेळी ते चौथ्या क्रमांकावर कसे गेले?,” असा सवालंही त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या