बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह

लखनऊ | मेरठमधील भाजपचे नगरसेवक मनीष उर्फ ​​मिंटू हे त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. तसेच त्यांच्या जवळ एक पिस्तूल सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. दुसरीकडे एसपी सिटी विनीत भटनागर यांचं म्हणणं आहे की सर्व बाजूने तपास सुरू आहे. प्राथमिक तपासणीत हे प्रकरण आत्महत्या केल्याचं दिसत आहे.

तीन वर्षांपूर्वी नगरसेवक मुनीश उर्फ ​​मिंटूच्या हॉटेलमध्ये एक तरुण महिला पोलीस निरीक्षकासह आली होती. यावेळी निरीक्षक आणि नगरसेवक यांच्यात वाद झाला. मनीषने पोलिसाला मारहाण केली देखील होती त्यामुळे मनीषला तुरुंगात जावं लागलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, मनीश आमदार सत्य प्रकाश अग्रवाल यांचे निकटवर्तीय होते. मनीषच्या हत्येची माहिती मिळताच भाजप आमदारांसह त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“संजय राऊत हे गडकरींनाच काय अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात”

दिलासादायक! येत्या 5 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होणार

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More