बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन दिवसांपूर्वी रूग्णालयातुन बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा ‘या’ शहरात सापडला मृतदेह

पुणे | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच आणि ठिकाणांहून रुग्णालयातूनच रुग्ण बेपत्ता होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये असाच काहीसा प्रकार घडला.

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह असणारी महिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर, समर्थ पोलीस ठाण्यात या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, काल अचानक त्या महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

भवानी पेठेतील होप हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार सुरू असतानाच बायमाबी कमरुद्दीन तांबोळी ही महिला अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर या महिलेचा मृतदेह हडपसर परिसरात आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासाअंती निष्पन्न होईल. पण उपचार घेत असलेले रुग्ण रुग्णालयातून असे थेट बेपत्ता होत असल्यामुळे  रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

मोठी बातमी ! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी

“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More