नाशिक | नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीचा मृतदेह कालव्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करायला सुरुवात केली आणि या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत तरुणीचं नाव दिपीका ताकाटे असून तिचा मृतदेह पिंपळगावाजवळ असलेल्या आहेर गावच्या कालव्यात आढळून आला होता. दिपीकाची हत्या झाली की अपघात हा संशय व्यक्त केला जात होता. मात्र दिपीकाची हत्या तिचा चुलत भाऊ विक्रम ताकाटे याने गळा आवळून तिची हत्या केली असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिपीकाची हत्या तिच्याच घरातील व्यक्तीने केली असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विक्रमने आपल्या साथीदाराची मदत घेऊन दिपीकाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली असल्याचं समजत आहे. मात्र दिपीकाच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, दिपीका कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडली होती. दिपीका संध्याकाळ झाली तरी घरी आली नव्हती. त्यानंतर घरच्यांनी काळजीपोटी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळानंतर घरच्यांना तिचा मृतदेह पालखेडमधील डाव्या कालव्यात सापडला होता.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे
काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे
ऐकावं ते नवलंच! गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करून तिच्या आईसोबत बॉयफ्रेंडचं पलायन
अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे