बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

नागपूर | कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजेश श्रीवास्तव छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले 1 मार्चपासून बेपत्ता होते. नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एक मार्चपासून पोलीस राजेश श्रीवास्तव यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

राजेश श्रीवास्तव यांच्याशी 1 मार्चपासून संपर्क होऊ शकत नव्हता. नागूपरमधील सीताबर्डी भागातील लॉजमध्ये 104 क्रमांकाच्या खोलीत ते राहत होते. त्यांनी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ते बेडवर मृतावस्थेत आढळले. लॉज मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, श्रीवास्तव वास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

थोडक्यात बातम्या-

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव

‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही”

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More