बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काश्मीरमधील ‘त्या’ शाळेसाठी अक्षय कुमारनं दिली आर्थिक मदत!

नवी दिल्ली | देशासाठी आपल्या मनात प्रचंड प्रेम असणारा अभिनेता अक्षय कुमार सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने काश्मीर येथील एका शाळेला 1 कोटी रुपयांची मदत दिली असून आता या शाळेचं बांधकाम पुर्ण झालं आहे.

17 जुलै रोजी अक्षयने सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत वेळ व्यतीत केला होता. यावेळी अक्षयने काश्मीर येथील नीरु गावाला भेट दिली होती. त्या गावातील शाळेची अवस्था पाहून अक्षयला राहावलं नाही. ती शाळा मोडकळीस आली होती. याच कारणामुळे अक्षयने त्या शाळेच्या जीर्णोद्वाराची मागणी करत तब्बल 1 कोटी रुपयांची मदत दिली.

अक्षयने दिलेली मदत ही त्याचे कैलासवासी वडिल हरिओम भाटिया यांच्या नावाने देण्यात आली होती. म्हणून या शाळेला देखील हरिओम भाटिया असं नाव देण्यात आलं आहे. या शाळेचं जीर्णोद्वार पुर्ण झालं असून याचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. याबाबतचं एक ट्विट बीएसएफने केलं आहे. या कार्यक्रमाची सर्व माहिती याच ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान, बीएसएफने केलेल्या ट्विटमध्ये कार्यक्रमाच्या फोटोंचा देखील समावेश आहे. तसेच यानंतर सर्वत्र अक्षयवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच अक्षयचा बेली बाॅटम आणि सुर्यवंशी हे दोन चित्रपट तयार असून त्याचे चाहते हे चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

आज शंभरावं वर्ष लागतंय, आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही- बाबासाहेब पुरंदरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More