बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाईव्ह शो चालू असताना झाला बॉम्बब्लास्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

जेरुसलेम | जेरुसलेममध्ये परत एकदा तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यामध्ये परस्परांवर हल्ले सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यामधील संघर्षादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसत आहेत.

गाझा पट्टीच्या शहरातून गेल्या तीन दिवसांत 1500 हून अधिक रॉकेटचा मारा करणाऱ्या जहाल गट हमास विरोधात इस्त्रायलनेही पलटवार केला आहे. यामध्ये हमासला मोठा झटका बसला आहे. त्याचे 11 कमांडर मारले गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाइनचे 70 लोक मारले गेल्याचं समजत आहे. तर दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्येयुद्धास तोंड फुटू शकते असा इशारा दिला आहे.

पॅलेस्टाइनमधील एक रहिवासी असलेल्या व्यक्तिच्या घराबाहेर स्फोट झाला. माया हुसेनने इन्स्टाग्राम आयजीटीव्हीवर हा व्हिडिओ दोन भागांत शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिलं आहे की, ‘प्रत्येकाने जागे व्हा. गाझामध्ये हल्ले, स्फोट होत आहेत.

दरम्यान, इस्त्रायल सैन्याच्या अंदाजानुसार हमासकडे सध्या 20 ते 30 हजार रॉकेट आहेत. आता आम्ही हमासला कायमचे शांत करूनच थांबू, असं इस्त्रायलने ठरवलं आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या दोघांमध्ये पुन्हा युद्ध सुरु होण्याचा इशारा दिला आहे. आता यामध्ये युरोपियन संघ मध्यस्थी करावी, अशी मागणी सुरक्षा प्रतिनिधी, जेरूसलेमपोस्ट अॅना अॅरनहाईम यांनी केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Maya Hussein (@mayahussein)

थोडक्यात बातम्या- 

“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

म्युकरमायकोसिस संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

काळजी घ्या, धोका वाढतोय! पुण्यात नव्याने कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला, वाचा आजची आकडेवारी

विनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More