बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला; बेदम मारहाणीमुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे | पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील एका अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील गोसावीनगरमध्ये ही घटना घडली आहे. अभिषेक फुलंब्रीकर असं मृत मुलाचं नाव असून मुख्य आरोपीचं नाव गणेश रेड्डी असं आहे. अभिषेक याचं वय केवळ 17 वर्ष होतं. अभिषेक आणि गणेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होतं. या भांडणाचा राग डोक्यात ठेवून गणेशने आपल्या 3 अल्पवयीन मित्रांच्या मदतीने अभिषेकवर हल्ला चढवला.

चौघांनी मिळून अभिषेकला बेदम मारहाण केली. अल्पवयीन मित्रांनीच प्राणघातक हल्ला करत डोक्यात, डोळयाजवळ, तोंडावर तसेच नाकातोंडातून रक्त येईपर्यंत अभिषेकला मारहाण केली. यादरम्यान अभिषेक गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी सात मित्रांचा समूह जंगलात शिकारी साठी गेला होता. यादरम्यान एका मित्राच्या हातून चुकून बंदुकीतली गोळी बाहेर आली आणि समूहातील एकाला ती लागली. या कारणामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे अनेक मित्रांच्या मनात अपराधी भावना निर्माण झाली. तसेच या समूहातील तिन जणांनी अपराधी भावनेतून आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली होती.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

“टक्का कुणाला ‘धक्का’ देणार, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावणार?”

“…तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More