बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सरपंच राहिलेल्या महिलेला कोणी खांदा न दिल्याने मुलाने….

नवी दिल्ली | कोरोना काळात अनेक मनाला चटका लावणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. कोरोना काळात काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन होत आहे तर काही ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे हिमाचल प्रदेशच्या कांगा जिल्ह्यातील रानीतालमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे.

रानीतालमध्ये विरसिंह या तरूणाच्या आईचा कोरोनाने मृत्यु झाला. विरसिंहची आई गावची माजी सरपंच असल्याची माहिती समजत आहे. कोरोना झाल्यावर उपचाराआधीच विरसिंहच्या आईचं कोरोनाने निधन झालं. मृतदेह नेण्यासाठी कोणीही खांदा द्यायला पुढं आलं नाही. त्यामुळे शेवटी मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून घेत अंत्यसंस्काराचं काम पूर्ण केलं असल्याचं विरसिंहने सांगितलं.

भांगवार पंचायतचे प्रमुख सूरम सिंह यांनी आपण आजारी होतो म्हणून जाऊ शकलो नसल्याचं सांगितलं.  प्रशासनाकडून पीपीई किटही मागवले होते मात्र मृत व्यक्तीचा मुलगा विरसिंह म्हणाला की, माझे नातेवाईक पीपीई किट घेऊन येत आहेत. मृतदेह उचलण्यासाठी दोन ट्रॅक्टर चालकांशीही संपर्क केला पण त्यांनी काहीही ऐकलं नसल्याचं सूरम सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, या कुटुंबाला गावातील काही लोकांनी मदत केली आणि त्यानंतर ते लाकूड आणण्यासाठीही गेले होते. विरसिंहचा एकट्याने मृतदेह नेण्याचा निर्णय चुकीचा होता, असंही सूरम सिंह म्हणाले. मात्र आपल्याला कोणीही मदत केली नसल्यामुळे एकट्याने मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आल्याचं विरसिंहने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत!

काय सांगता! ओम, ओम म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह अन्….

“महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही”

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More