बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेझाॅनचं पार्सल पोहोचवणारा मुलगा ते विश्वचषकातील सामनावीर; स्काॅटलंडच्या खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास

दुबई | टी-ट्वेंटी विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. टी-ट्वेंटी हा क्रिकेटचा सर्वात रोमांचकारी प्रकार आहे. एकूण 12 मुख्य संघात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या अगोदरच 8 मुख्य संघानी आपलं स्थान पक्क केलं आहे. उर्वरित चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी अतितटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यात स्काॅटलंडनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.

स्काॅटलंड आणि बांग्लादेश दरम्यान पात्रता फेरीतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात स्काॅटलंड संघानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत बांग्लादेशला पराभूत केलं आहे. स्काॅटलंडकडून ख्रिस ग्रिव्हजनं अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. विश्वचषकाच्या अवघ्या काही महिने अगोदर ख्रिस अमेझाॅनचं पार्सल पोहोचवणाऱ्या गाडीचा चालक होता. परिस्थितीवर मात करत ख्रिस इथपर्यंत पोहोचला आहे.

सामन्यादरम्यान स्काॅटलंड एकवेळी 53 धावांमध्ये 6 गडी गमावले होते. पण ख्रिसच्या 28 चेंडूतील 45 धावांच्या जोरावर स्काॅटलंडनं 140 पर्यंत मजल मारली. स्काॅटलंडनं दिलेल्या आव्हानाचा बांग्लादेश सहज पाठलाग करेल, असं वाटत असताना ख्रिस पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. एकाच षटकात धोकादायक फलंदाज शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहिम यांना बाद करत सामन्याचं चित्र बदलून टाकलं. परिणामी ख्रिसच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्काॅटलंडनं हा सामना 6 धावांनी जिंकला आणि धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.

दरम्यान, ख्रिसला त्याच्या कामगिरीबद्दल सामनाविराचा किताब देण्यात आला. परिस्थिती कशीही असो मनात जिद्द असेल तर आपण यशस्वी होतो हे ख्रिसनं जगाला दाखवून दिलं आहे. ख्रिस क्रिकेट खेळातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे.

थोडक्यात बातम्या 

कौतुकास्पद! संकटाला आनंदाने सामोरं जाणाऱ्या पुण्याच्या आजीला नेटकऱ्यांनी केला सलाम

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More