बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही, म्हणून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा गृहविभागाला ई- मेल अन्…

पुणे | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा ई-मेल आल्याने पोलिसांसह सर्व प्रशासन काल रात्री सतर्क झालं होतं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गृह विभागाला मंत्रालयात बाॅम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता हा मेल पाठवणाऱ्या शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील घोरपडी परिसरातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित प्रकरणात मुलाला शाळेत ॲडमिशन मिळालं नसल्याने गृह विभागाला धमकीचा ई-मेल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल गृह विभागाला पाठवला होता. त्यानंतर, सर्व प्रशासन सतर्क झालं आणि सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या.

यापूर्वीही नागपुरमधील एका तरूणाने फोन करून मंत्रालयात बाॅम्ब असल्याचं सांगितलं होतं. पण शेवटी असा कोणत्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आला नसून संबंधीत तरुण हा मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट झालं होतं. यावेळीही मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या शैलेश शिंदे याला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

चिंता वाढली! कोरोनाच्या घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे या जिल्ह्यांत सापडले रूग्ण

बापमाणूस! लेकीच्या ‘ऑनलाईन क्लास’साठी मुसळधार पावसात छत्री घेऊन राहिला उभा

मोठी बातमी! ‘राज्यात 18 वर्षावरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस’; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More