बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किंग खान’चा जलवा कायम! ड्रग्स प्रकरणात मुलगा तुरूंगात तरीही…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरणात तुरूंगात आहे. आपल्या मुलाच्या सुटकेसाठी शाहरूख खान मोठे प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आता शाहरूख खानला दिलासा देणारा एक अहवाल आता समोर आला आहे.

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकल्यानं अनेक कंपन्यांनी शाहरुखच्या जाहिराती ब्लाॅक केल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात शाहरुखची लोकप्रियता घटेल, अशी शक्यता होती. मात्र, या प्रकरणामुळे शाहरूखची लोकप्रियता घटली नसल्याचा अहवाल उद्योग क्षेत्रातून समोर आला आहे.

शाहरूख हा लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. ड्रग्स प्रकरणात शाहरूखची लोकप्रियता कमी झाली नाही. तो आता पुन्हा जाहिरातींमध्ये दिसून येतोय, असं उद्योग जाहिरात तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हिंदूस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. नुकतीच शाहरूखने डिझनी प्लस हाॅटस्टारची आणि भारत पाकिस्तान सामन्याची जाहिरात केली होती.

दरम्यान, शाहरूखने अनेक लोकप्रिय ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. शाहरूख खान सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करू शकतो. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीसाठी कोट्यावधी रूपये खर्च करतात.

थोडक्यात बातम्या- 

“राजकारण आता व्यापार झालाय, खऱ्याच्या बाजूने कोणीही बोलत नाही”

इम्रान खानच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी भिडले

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत किरण गोसावी लखनऊमधून फरार

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More