‘ती’ एक चूक महागात पडेल?; भाजपचं टेंशन वाढलं!

पुणे | भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Bjp Mla Laxman आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

कसब्यात भाजप नेते हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मोठी नाराजी उफळल्याचं चित्र आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातांकडून बॅनरबाजी केली जात आहे.

पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की आमचंही ठरलंय धडा कसा शिकवायचा. कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा टिळकांचा. का काढला आमच्याकडून कसबा?. आम्ही दाबणार NOTA, असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आलाय.

दरम्यान, याआधीही कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यापूर्वीच कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का?, असा सवाल करण्यात आला आहे.

या दोन्ही मतदारसंघात भाजप (Bjp) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. मात्र कसब्यात टिळक परिवारातील सदस्याला उमेदवारी न मिळाल्याने ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा सामनाही भाजपला करावा लागतोय. यामुळे टिळक परिवारातील व्यक्तीला उमेदवारी न देणं ही भाजपची चूक ठरेल, अशा चर्चा रंगू लागल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More