बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेकअप खराब होईल म्हणून मास्क न लावणं नवरीला पडलं चांगलंच महागात!

चंदिगड | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अनेक लोक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. अशातच हरियाणामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका नवरीने मेकअप खराब होईल यामुळे मास्क न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मास्क न लावणं या नवरीला चांगलंच महागात पडलं आहे.

संबंधित घटना ही बुधवारी घडलेली आहे. सेक्टर 3 ठाण्यात तैनात एएसआय जितेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात सेक्टर 8/9 च्या नाक्यावर बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान तेथून एक कार गेली. या कारमध्ये बसलेल्या नवरीने तोंडाला मास्क न लावल्याकारणाने चंदिगड पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तसेच नवरीने मास्क न लावल्याबाबत पोलिसांनी त्यांना विचाराणा केली.

चंदिगड पोलिसांनी नवरीने मास्क न लावण्या बद्दल सवाल केल्यानंतर तिचा मेकअप खराब होईल म्हणून मास्क न लावल्याचं कारण नवरीच्या भावाने दिलं. त्यानंतर सर्वांना नियम सारखे लागू होतात, असं म्हणून चंदिगड पोलिसांनी हजार रुपयांचं चलन फाडलं. आधी नवरीचे लोक दंड भरण्यास नकार देत होते. मात्र त्यांना दंड भरावाच लागला.

मास्क लावला असता तर नवरीचा मेकअप खराब होईल. त्यामुळे तिला ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसविण्यात आलं होतं. मात्र मास्क लावला नव्हता. तर या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, नियम सर्वांसाठी समान आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी ?’; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल

नाशिकच्या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग; महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

सीताराम येचुरी यांच्या 34 वर्षीय मुलाचं कोरोनाने निधन

“कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल”

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More