बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नानंतर पाचच तासात नवरीला मृत्यूनं गाठलं, नवरदेवानं दिला मुखाग्नी

पाटणा | नव्या संसाराची सुरुवात करण्यासाठी आनंदी आणि सकारात्मक वातावरणामध्ये बिहारमधील एका तरुण तरुणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. पण त्यांना काय माहिती होतं की, अवघ्या काही वेळातच त्यांच्यावर काळाची झडप बसणार होती. लग्नाच्या अवघ्या पाच तासाच्या आतच नववधूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवीन संसाराला सुरुवात करण्याअगोदरच नववधूवर हे जग सोडून जाण्याचं दुर्दैव आलं. दरम्यान, बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना असून अफजल नगर पंचायतीअंतर्गत खुदीया गावामध्ये निशा कुमारी आणि रविश यादव या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न घर असल्यामुळे आनंदाचं वातावरण आणि सगळीकडे लगबग सुरू होती ठरलेल्या वेळेनुसार लग्नही झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांनुसारच लग्न सोहळा पार पडला.

लग्न झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिची तब्येत बिघडली आणि तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. निशाची तब्येत आणखीनच बिघडल्याने तिला भागलपूरला हलवण्यात आलं. नवरीच्या वेशामध्येच असलेल्या निशाला रुग्णालयात दाखल केलं गेलं पण तिची तब्येत जास्त बिघडत गेल्याने अखेर तिचा लग्नाच्या अवघ्या पाच तासांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

निशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. निशाच्या झालेल्या मृत्यूनंतर रवीश यादव या तिच्या पतीवर तिला मुखाग्नी देण्याची दुर्दैवी वेळ आली. सात जन्म एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्यानंतर आपला जोडीदार असा अकाली निघून गेल्याने रवी यादव याला या गोष्टीचा जबर धक्का बसला.

थोडक्यात बातम्या –

“देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॅाकडाऊन लावण्यात यावा”

“कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल”

काळ्या बुरशीचा धोका वाढला; मास्क वापरताना ‘या’ गोष्टी करणं पडू शकतं महागात!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या आमदारावरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, आमदारच संशयाच्या फेऱ्यात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More