बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर मंडपात नवरीने नवऱ्याच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

लखनऊ| उत्तर प्रदेशातील विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना हमीरपूर जिल्ह्यात घडली आहे. वधू भर मंडपामध्ये नवरदेवाच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. नवरदेव व्यसनाधीन असल्याने नवरीने कानाखाली लगावल्याची माहिती आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ ललपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वासा गावातील आहे. सर्वांना स्तब्ध करणारी येथे घडली आहे. बँड आणि ढोल ताशाच्या तालावर वरात देखील आली होती. परंतु, ऐन लग्नघटीकेवेळी वधूने नवरदेवाच्या कानाखाली लगावली.

नववधूने असे कृत्य का केले? हे कोणालाच समजत नव्हते. नवरदेव रविकांत याने अगोदर नवरीला हार घातला. तेव्हा नवरीच्या लक्षात आले की, आपले होणारे पती हे दारूचे व्यसन करतात. त्यानंतर लगेच वधूने वराच्या दोन कानाखाली भडकवल्या.

दरम्यान, याप्रकरणी मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. लग्न समारंभामध्ये दारू न पिण्याचा सल्ला अनेकांनी दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

पाहा व्हिडिओ- 

थोडक्यात बातम्या- 

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “सीतेचं अपहरण करून रावणाने…”

पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

‘आम्ही दादागिरी केली असती तर…’; संदीपान भूमरे यांचं राजेश टोपेंना प्रत्युत्तर

‘महिलेसमोर नाक घासायला लावलं’, अपमान सहन न झाल्यानं तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More