बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन

भोपाळ | लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नववधूला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला आणि त्यामुळे तिच्या नवऱ्यासह 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं. ही घटना मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये घडली आहे. नवऱ्या मुलीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

18 मे रोजी या मुलीचं लग्न झालं. सतलापुर येथे वास्तव्य करणाऱ्या तरुणाशी या मुलाचा विवाह झाला. आता या नवऱ्या मुलीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिच्या नवऱ्यासह 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं.

ज्या नववधूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तिला सात दिवस आधीपासून ताप येत होता. औषध घेऊनही तिला बरं वाटलं नाही. त्यामुळे शनिवारी तिची करोना चाचणी झाली. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 18 मे रोजी तिचे लग्न झाले. त्यानंतर मंगळवारी तिच्या करोना चाचणीचा अहवाल आला जो पॉझिटिव्ह आल्याचे माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना फोन करुन सांगितलं.

दरम्यान,  ज्यानंतर या मुलीला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच दोन्हीकडचे कुटुंबीय, या मुलीचा नवरा, लग्न लावणारे भटजी यांच्यासह एकूण 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या-

“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More