Top News

सनरुफ उघडून नाचत होती नवरी, तेवढ्यात घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@utkarshs88

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाच्या वरातीत आलेल्या सुसाट कारमुळे 12 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अपघात झाला त्यावेळी होणारी नवरी कारचं सनरुफ उघडून आनंदात नाचत होती. परंतू ती या अपघाता थोडक्यात बचावली आहे. या घटनेचा व्हिडीओ वरातीत नाचत असलेल्या एका व्यक्तीच्या फोनमध्ये शूट झाला आहे. तसेच या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मि़डीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिल्ली-देहरादून हायवेवरील सभागृहात हेमा आणि अंकुरचं लग्न ठरलं होतं. नवरदेवाची वरात जवळ आल्याचं  बघितल्यानंतर हेमाने आनंदाच्याभरात कारचं सनरुफ काढून नाचायला सुरुवात केली.

दरम्यान, जखमी झालेल्या वऱ्हाडींना मेरठच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. मात्र ड्रायव्हर फरार झाला असून त्याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या