बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’! भावांचं हे गिफ्ट बहिणींच्या आयुष्यभर राहणार लक्षात, पाहा व्हिडीओ

पुणे | देशभरात रक्षाबंधनाचा सण हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचं वचन देतो. त्यासोबतच लाडक्या बहिणील भाऊ तिची आवडती वस्तू किंवा इतर काही भेट म्हणून देतात. बहिणीलाही तिचा दादा काय देणार याची उत्सुकता लागलेली असते. काही वेळा भाऊ हा असं गिफ्ट देतो की बहिणीचा आनंद गगनात मावत नाही. असंच काही गिफ्ट पुणे जिल्हात हवेली तालुक्यातील बिवरी गावातील भावांनी बहिणीला दिलं आहे.

या भावांनी आपल्या बहिणींना खास हेलिकॉप्टर राईड भेट आयोजित केली होती. भावांच्या या अनोख्या गिफ्टमुळे बहिणीही आनंदी झाल्या होत्या. कारण गावातील लोकांसाठी हेलिकॉप्टरची सवारी म्हणजे स्वप्न पाहिल्याप्रमाणे असते.

बिवरी गावातील भावांनी आपल्या बहिणींची इच्छा पुर्ण केली आहे. या अनोख्या गिफ्टची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. भावांनी दिलेल्या गिफ्टवर बोलताना, खूप भारी वाटलं कारण असं गिफ्ट कधीच कोणाला मिळाल नसेल, अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला.

दरम्यान, हेलिकॉप्टर चालवणारे पायलट या गिफ्टवर बोलताना म्हणाले की, माझं नशीब आहे की मला या बहिणींना हेलिकॉप्टरची राईड माझ्या हातून झाली. या गिफ्टची चर्चा हवेली तालुक्यामध्ये आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“‘या’ महिन्यात दोन लाख आयसीयु बेड तयार ठेवा”

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस, असा असणार मार्ग!

‘कुत्री कितीही भुंकली तरी…’; इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा

‘माझ्या बहिणीपासून लांब रहा’; ‘त्या’ वेळी रोहितला युवराज सिंहने दिली होती धमकी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More