बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्लीज मदत करा’, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड

नवी दिल्ली | सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोना फोफावत चालला असून देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रूग्णांच्या संख्येमुळे बेडची कमतरता पडू लागली आहे. यामध्ये सामन्य लोकांनाच नाही तर मंत्र्यानाही बेडसाठी ताटकळत रहावं लागत असल्याचं दिसत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी आपल्या भावाला बेड मिळाला नाही त्यामुळे बेड उपलब्ध करून देण्यासाठी  ट्विट केलं आहे.

आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना संसर्ग झालेला असून त्याच्या उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही. कृपया तुम्ही लक्ष घाला, असं व्ही.के. सिंग यांनी म्हटलं आहे. सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये  गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग केलं आहे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ त्रिपाठी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज सिंह यांना टॅग केलं.

जनरल व्ही.के.सिंग हे मोदी सरकारमधले फक्त मंत्री एवढीच त्यांची ओळख नाही तर ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. मंत्री असतानाही त्यांच्या घरातील लोकांना बेड मिळत नसेल तर विचार करा की किती भीषण परिस्थिती उद्धवली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करत घरात बसून आपली काळजी घ्यायला हवी.

दरम्यान, उत्तर प्रदेशामधील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शनिवारी राज्यात 27 हजार 357 नवे रुग्ण समोर आले. तर 120 जणांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 9 हजार 703 जणांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्र सरकारवर बालीश आरोप करणं बंद करा आणि कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या- चंद्रकांत पाटील

“बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत आहे”

“…नाहीतर स्वतःला मर्द म्हणणं तरी बंद करा”

देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत अमित शहा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘मुंबईत लोक मरत आहेत आणि तुम्ही आयपीएल काय खेळताय?’; राखी सावंत भडकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More