नागपूर | नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरूण मुलीच्या आजीची तसंच लहान भावाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरलंय.
आरोपीने एकतर्फी प्रेमातून 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे तर 10 वर्षांच्या अवघ्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने हत्या केलीये. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करतायत.
दरम्यान हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळालीये. शिवाय हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता. शोध घेतला असता त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या उघड झालंय.
हा आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील एका तरूण मुलीच्या सतत मागावर होता. त्यानंतर एक दिवस आरोपीने तरुणीचं घर गाठून आजी आणि भावाची हत्या केली.
थोडक्यात बातम्या-
गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड
मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी
गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा
देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन
…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल