बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

कोलकाता | कोलकाता येथील स्ट्रंड रोड भागात एका बहुमजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मच्याऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या इमारतीत पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे.

पूर्व रेल्वेचे प्रवक्ता कमल देव यांनी सांगितलं की, न्यू कोयलाघाट इमारतीत ही आग लागली होती. यामध्ये पूर्व रेल्वेचे आणि दक्षिण पूर्व रेल्वेचे क्षेत्रीय कार्यालय आहे. त्याचबरोबर इमारतीच्या तळमजल्यावर कम्प्यूटराइज्ड तिकीट बुकींग कार्यालय आहे. आगीमुळे तिकीट बुकींगवर परिणाम झाला आहे.

आग लागल्याचं कळताच सुरक्षा रक्षक तातडीने 13 व्या मजल्यावर पोहचले आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयाला 2 लाख रूपयांची भरपाई जाहीर केली आहे. घटनेनंतर बऱ्याच उशीरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी न्यू कोयलाघाट इमारतीत पोहचल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की, न्यू कोयलाघाट इमारतीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 4 अग्निशमन दलाचे कर्मचारी, हरे स्ट्रीट पोलिस ठाण्यात तैनात असलेले सहायक उपनिरीक्षक आणि आरपीएफचे एक जवान असल्याचं अग्निशमन आणि आपत्कालीन सेवामंत्री सुजीत बसू यांनी सांगितलं. घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादयक पाऊल!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More