कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. युक्रेन सैन्यासह शेकडो नागरिकांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला.
युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेल्या शाळेची इमारत रशियाकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
युक्रेनमधील बंदाराचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारियुपोल येथील शाळेवर रशियाने बॉम्ब हल्ला केला. या इमारतीत 400 नागरिक आश्रयासाठी होते. या हल्ल्यात ही इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. शेकडो नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनमधील मुख्य शहरांवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. मारियुपोल सामरिकदृष्ट्या एक महत्त्वाचे बंदर आहे. या शहराला देखील रशियन सैनिकांचा वेढा असून यावर सातत्याने बॉम्ब हल्ले सुरू आहेत. शाळेवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.
थोडक्यात बातम्या-
“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”
मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं
‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो…’,करूणा शर्मांचं खळबळजनक वक्तव्य
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
Russia Ukraine War | रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Comments are closed.