बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मुलीनंच घरच्यांच्या जेवणात मिसळलं विष; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

चंदिगड | पंजाबमधील लुधियाणा येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सतत काही ना काही कारणांमुळे आजारी असलेल्या कुटुंबाचं ओझं झेपत नसल्याने मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या आईसह भावाची जेवणातून विष देऊन हत्या केली तसेच स्वतःही तेच जेवण घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटनेतील आरोपी मुलीचं नाव मनदीप कौर असं आहे. तसेच मृत झालेल्या तिच्या भावाचं नाव गुरप्रीत सिंह सोनी असून तो 37 वर्षाचा होता. तर मुलीच्या आईचं नाव जसबीर कौर असं आहे आणि त्यांचं वय 58 वर्ष आहे. या दोघांनाही संपवरणाऱ्या मनदीप कौरचं वय केवळ 27 वर्ष आहे. मनदीपचा भाऊ गुरप्रीत हा सात वर्षांपुर्वी छतावरुन पडला होता. त्यानंतर तो कोमामध्ये गेला. काही काळानंतर मनदीपची आई देखील सतत आजारी पडत असायची.

कुटुंबातील सततच्या आजाराचं ओझं मनदीपला झेपानासं झालं होतं. ती मानसिक त्रासाला सामोरं जाऊ लागली. या कारणामुळे मनदीपने 12 एप्रिल रोजी जेवणात विष मिसळलं. हे जेवण तिने तिच्या आई आणि भावाला दिलं. तसेच तिने देखील तेच जेवण घेतलं. विषग्रस्त जेवण घेतल्याने सगळे जण बेशुद्ध पडले होते. 13 एप्रिलला मनदीपच्या आईचं निधन झालं तर 14 एप्रिला गुरप्रीतचं. यानंतर शनिवारी सकाळी मनदीपची देखील जीवनयात्रा संपली. घराशेजारी राहणाऱ्या एक महिला घरी आल्यानंतर संबंधित घटना उजेडात आली.

दरम्यान, लुधियाणा येथे एका आठवड्याच तीन अंत्यसंस्कार झाल्यामुळे संपुर्ण परिसरात शोकांतिका पसरली आहे. तसेच या घटनेसंदर्भात पोलिसांनी 174 कलम अंतर्गत कारवाई सुरु केली आहे. संबंधित आरोपी मुलीचा भाऊ सात वर्षांपासून कोमात होता तर आई जखमी असल्याने तीने हे पाऊल उचललं. या कारणामुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More