बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. मध्य प्रदेशमध्ये उमा भारती यांनी स्वत:च्या पक्षाविरूद्ध आंदोलन केल्यानं उमा भारती प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यातच आता उमा भारती यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या पुन्हा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

ब्युरोक्रेसी म्हणजे काहीच नाही. ब्युरोक्रेसी आमच्या चपल्या उचलण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला फिरवतात, तसं आजिबात नाही. ते आमच्या चपल्या उचलतात. आधी खासगीत चर्चा होते नंतर फाईल तयार होते, असं वक्तव्य उमा भारती यांनी केलं आहे.

आमच्या परवानगीशिवाय काहीही केलं जात नाही. आम्ही त्यांना पगार देतो. आम्ही त्यांचा पगार ठरवतो. आम्ही त्यांच्या पोस्टिंग ठरवतो. प्रमोशन डिमोशन सगळं काही आम्ही ठरवतो. त्यामुळे त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये उमा भारती यांनी दारूबंदीविरूद्ध आंदोलन छेडलं आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. त्यातच आता उमा भारती स्वपक्षीय सरकारविरूद्ध आंदोलन छेडलं असल्यानं आता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

‘मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More