Top News महाराष्ट्र मुंबई

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

मुंबई | वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली स्विफ्ट कार अखेर बाहेर काढण्यात आली आहे. मुळात ही कार आतमध्ये कशी गेली होती हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

वसईमधील एक तरूण-तरूणी समुद्रकिनारी मौजमजेसाठी आलं होतं. रात्रीच्या वेळी मंगळवारी ते आले होते. बराच वेळ त्यांनी तिथे मस्ती केली आणि रात्रीच्या मुक्कामाचा बेत तिथेच आखला.

झोपण्यापुर्वी कार त्यांनी समुद्रकिनारी पार्क केली आणि ते झोपी गेले. मात्र हे झापले असताना कार रात्रीच्या वेळी भरतीच्या पाण्यासोबत कार पाण्यात वाहून गेली. सकाळी उठल्यावर त्यांना आपली कार दिसेनासी झाली. त्यांना वाटलं की आपली कार चोरीला गेली परंतू त्यानंतर त्यांना कार पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचं दिसलं.

दरम्यान, यानंतर तिथे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. मात्र ढवळत असलेल्या पाण्यामुळं कारला बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. मात्र अथक प्रयत्नांनंतर कारला बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे पर्यटन स्थळी गेल्यावर तुम्हीही आपली कार व्यवस्थितपणे पार्क करा.

थोडक्यात बातम्या-

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

“आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की संभाजी राजेंचा स्वाभिमान की मुख्यमंत्री पदाची खुर्ची”

“औरंगाबादचं संभाजीनगर करणं झेपलं नाही पण ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे यशस्वीपणे केलं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कोरोना पॉझिटीव्ह

तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या