मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरेतील जंगल व कारशेड संदर्भात मोठी घोषणा केलीये.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा विरोध होता. त्यानुसार आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरेतील कारशेड आता कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार आहे. कांजूरमार्गमध्ये ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. या कामासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मेट्रो कर्मचाऱ्यांचेही आभार मानतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार
सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती
मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे