अहमदनगर | कीर्तनकार, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावर संगमनेर न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयाकडून या खटल्यासाठीची पुढील तारीख 16 डिसेंबर देण्यात आली आहे.
इंदोरीकरांविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र कोर्ट रजेवर असल्याने ही सुनावणी काल म्हणजेच 9 डिसेंबरला पार पडली. या सुनावणीत पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली. इंदोरीकरांतर्फे ऍड. के. डी. धुमाळ, बाजू मांडत आहेत. तर या खटल्यात अरविंद राठोड यांची नवीन सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली असून, या खटल्याची तपासणीही राठोड करणार आहेत.
सरकारी वकिलांनी खटल्याच्या संदर्भात कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे अपिलाच्या कामी बोलाविण्यात यावेत, असा कोर्टाने हुकूम केला असून, इंदुरीकरांच्या वकिलांनी प्रमाणित कागदपत्रे जिल्हा न्यायालयात दाखल करावे, असा आदेश न्यायालयाकडून काढण्यात आला आहे.
दरम्यान, कीर्तनातून पीसीपीएनडी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदोरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला होता.
थोडक्यात बातम्या-
‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार
आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज
कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट
“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी