महाराष्ट्र सोलापूर

‘प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला’; खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड

Loading...

सोलापूर | अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांंनी केली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आपली खासदारकी वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.

जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता जयसिद्धेश्वरांनी जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार केली आहे.

जयसिद्धेश्वरांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच आता जातीचा दाखला हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे.

दरम्यान, 9 तारखेला प्रवासादरमयान दाखला हरवला असून या संदर्भात 14 तारखेला पोलिसांत खासदारांच्या नावाने तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे

‘सोशल मीडिया’त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ

महत्वाच्या बातम्या- 

‘नशीब ते जिवंत तरी आहेत’; न्यायमूर्तीच्या बदलीवरून रिचा चड्डाचा केंद्र सरकारला टोला

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे

आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या