बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सुशांतने 10 वाजून 10 मिनिटांनी…..’; एक वर्षभरानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण

मुंबई | दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला काल म्हणजेच 14 जूनला एक वर्ष पुर्ण झालं आहे. अवघ्या 34 वर्षांच्या सुशांतने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. सुशांतने अकाली जगाची एक्झिट घेतली होती. सुशांतच्या मृत्युचं गुढ गेल्या वर्षभरापासून होतं. कारण सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतू आता एका वर्षानंतरही त्याच्या मृत्यूशी अनुत्तरित राहिलेलं प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने या प्रकरणाबाबत खात्री करत सांगितलं आहे की,  सुशांतच्या मृत्यूमागे आत्महत्या हेच कारण असून त्याने सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी आत्महत्या केली आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार एम्सच्या फॉरेन्सिक पथकाच्या तपासानुसार निधनाच्यावेळी सुशांतनं मद्यपान केलं नव्हतं आणि त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमाही नव्हत्या.

सुशांतने मृत्यू दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास ग्लासभर पाणी डाळिंबाचा रस प्यायला होता. या दोन्ही गोष्टी त्याने त्याच्या घरात घरकाम करणाऱ्या व्यक्तिकडून मागितल्या होत्या.  फॉरेन्सिक तपास पथकातील एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही याबाबतचा सर्व अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. आमच्या पथकाने आत्महत्या झालेला सर्व प्रकार पुन्हा करून पाहिला. त्यानंतर डॉक्टरांनी सखोलपणे चौकशी करत सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरल्यानं झाल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, गेल्या वर्षी 14 जूनला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सुशांतची गर्लफ्रेंण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये वेळ सरली की आपण माणसाला हळूहळू विसरतो मात्र माझ्यासाठी तुच माझी वेळ, माझे सर्व काही असल्याचं रियाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More