बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

नवी दिल्ली | सीबीआयने सध्या लाचखोर पोलिसांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. मागील काही महिन्यांपासून सीबीआय दिल्लीतील भ्रष्ट पोलिसांचा तपास घेत आहे. यासाठी सीबीआयने अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या घरावर छापेदेखील मारले आहेत. त्यातच सीबीआयच्या हाती एक लाचखोर अधिकारी लागला आहे. भोजराज सिंह असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

तक्रारदार त्यागी मनोज आणि अनुजविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भोजराज सिंह याच्याकडे होता. यावेळी भोजराज सिंह याने आपल्याकडे जामीन अर्जाचा विरोध न करण्यासाठी 5 लाख रुपये मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. त्यानंतर पोलिसांनी भोजराज याच्या घरी छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी 1 कोटी 12 लाख रुपये रक्कम सापडली आहे.

भोजराज यांनी 5 लाख मागितल्यानंतर तक्रारदाराने 2 लाख देण्याचे कबूल केले होते. त्याबदल्यात पोलिसांनी आरोपीविरोधात कोर्टात बाजू मांडायची नाही, असं ठरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे फोनवर बोलताना भोजराज सिंह यानी 5 लाखांसाठी ‘5 किलो लाडूची सोय करा’ असा कोडवर्ड वापरला होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्याने हा शब्द वापरला होता.

पोलिसांनी भोजराज आणि तक्रारदार यांचे फोन रेकॉर्डिंग तपासल्यानंतर भोजराज याने 5 किलो लाडूची सोय करा, असं सांगितल्याचं समोर आलं आहे. शिवाय यावेळी भोजराज याने फोनवर बोलताना लाडू एकटा थोडी खाणार? काही लाडू साहेबांना मिळणार, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता यामध्ये नेमक्या अजून कोणत्या अधिकाऱ्याचा समावेश आहे?, याचा तपास पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ शिंदे यांना कुटूंबासह जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’; आर्यनला जामीन मिळताच नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाण पुन्हा होणार सुरू! पण ‘या’ वेळात हवाई वाहतूक बंदच

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More