बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्धशतकानंतर नितीश राणाचं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या विशेष कारण

चेन्नई | आयपीएल गेली 13 वर्ष भारतात चांगलीच गाजत आहे. आयपीएलमधील सेलिब्रेशन आयपीएलला खास बनवतं. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू विजयानंतर सेलिब्रेशन करताना दिसतात. आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी हरवून या आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात नितीश राणानं केलेलं सेलिब्रेशन खास ठरलं.

सलामीला आलेल्या नितीश राणानं आक्रमकपणे फटकेबाजी चालू केली. शुभमन गिल बाद झाल्यावर खेळायला आलेल्या राहुल त्रिपाठीने राणाला मोलाची साथ दिली आणि दोघांनी जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. नितीश राणाने आक्रमक खेळी करत या आयपीएल हंगामातलं पहिलं अर्धशतक केलं. त्यानंतर त्यानं डगआऊटकडे बोट दाखवत खास सेलिब्रेशन केलं.

नितीश राणानं जे बोट दाखवलं त्या बोटात अंगठी घातली होती. नितीश राणाचा सांचीसोबत विवाह झाला आहे. त्यानं हे अर्धशतक पत्नी सांची हिला समर्पित केलं आहे. मागील हंगामात नितीश राणानं असंच एक सेलिब्रेशन केलं होतं. नितीशचे सासरे सुरिंदर यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. त्यानंतर नितीशने सुरिंदर नावाची जर्सी दाखवत आपल्या अर्धशतकीय खेळीचं सेलिब्रेशन केलं होतं.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावा केल्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर कोलकाताला या हंगामातील पहिला विजय मिळवता आला. कोलकाता नाईट रायडर्सचा पुढील सामना 13 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरूद्ध होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत, रोहित पवारांना कुठून मिळालं?”

आनंदाची बातमी!; महाराष्ट्रातील एक कोटी लोकांना मिळालं सुरक्षाकवच

कोलकताने फोडला विजयाचा नारळ; राहुल-राणाच्या खेळीपुढे पांडे-बेयरस्टोची खेळी व्यर्थ

इंदोरीकर महाराजांचा थोडा वेळ गेला, मात्र ‘या’ मंडळींना चांगला झटका दिला!

सेक्सनंतर प्रेयसीने केली विचित्र मागणी, वैतागलेल्या प्रियकराने थेट तज्ञांकडे मागितली मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More