बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे आणि मुंबई सारख्या शहरात पेट्रोलची किंमत 107 रूपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असल्यानं इंधनाचे दर वाढत आहेत, असं केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय. मात्र केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करामधून बक्कळ पैसा कमवत असल्याची माहिती समोर आली आहे.

एप्रिल 2020 ते मार्च 2021 या मागील आर्थिक वर्षात केंद्र सरकारने इंधनातून मिळणाऱ्या कराच्या माध्यमातून तब्बल 3.35 लाख कोटी रूपयांची घसघशीत कमाई केली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत इंधनातून मिळणाऱ्या उत्पन्नात 88 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020  या आर्थिक वर्षात इंधनातून मिळणाऱ्या करातून केंद्राला 1.78 लाख कोटी रूपये मिळाले होते. त्यामुळे आता इंधनाच्या करातून मिळणारा पैसा हाच केंद्राच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनला आहे.

कोरोनाच्या काळात आखाती देशातूून येणाऱ्या तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकार किंमती कमी करेल अशी अपेक्षा होती. परंतू त्यावेळी देखील केंद्र सरकारने किंमती कमी केल्या नाही. त्याउलट मे 2020 पासून किंमती आणखी वाढल्या होत्या. गेल्या 7 महिन्यात पेट्रोलच्या मागणीत 10 टक्क्यांची घट झाल्याचं देखील समोर आलं आहे. तर कराच्या माध्यमातून सरकारला मोठा नफा झाल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात सर्व क्षेत्रातील उद्योगधंदे बंद झाले होते. त्यामुळे सर्विस सेक्टर वगळता बाकी सर्व क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसला. कोरोना महामारीच्या आधीपासूनच अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यामुळे केंद्र सरकाला पैसे उभा करणं अवघड झालं होतं. त्यामुळे कराच्या माध्यमातून आणि काही सरकारी कंपन्या विकून सरकारने पैसा उभा केला होता. मात्र, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसतोय.

थोडक्यात बातम्या-

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More