बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकारकडे स्वत:चं कौतुक करणारी आकडेवारी आहे, आणि तिच एक दिवस देशाला बुडवू शकते”

मुंबई | 20 जूलै रोजी केंद्राने संसदेमध्ये देशात ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल सादर केला. तेव्हापासून विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरणही या अहवालामुळे चांगलंच ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी याच मुद्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात कोविड संदर्भात पारदर्शक आकडेवारी उपलब्ध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

केंद्र सरकारकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे. ती केंद्र सरकारचं कौतुक करणारी आकडेवारी आहे, आणि तिच एक दिवस देशाला बुडवू शकते. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी केंद्र सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी एका वृत्तपत्राच्या बातमीचा फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोमधील बातमी मे 2021ची असून, त्यामध्ये तिरूपती येथील रूग्णालयात ऑक्सिजन अभावी 11 जणांचा मृत्यू झाला असल्याचं लिहिलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अहवाल सादर केल्यानंतर तो ऐकूण आम्हाला धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच याविरोधात केंद्र सरकारवर खटला भरावा, अशी मागणीही राऊतांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More