बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

नवी दिल्ली | सध्याचं सरकार भारताचा खरा स्वभाव ओळखू शकलं नाही म्हणून या समस्या तयार झाल्या आहेत. भारताने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी चीन आणि साऊथ कोरियापासून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भारतात हेल्थकेअर, सोशल कोएलिशन आणि अर्थकारण यांची केंद्र सरकारने वाईट अवस्था केली आहे, असं नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटलंय.

कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोई नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानानी लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं, पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधनं नाहीत याकडे दुर्लक्ष केलं, असं अमर्त्य सेन सांगितलं. ते राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्राय डे फ्लेम’ या कार्यक्रमात बोलत होते.

आधीच नोट बंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली, अशी टीका अमर्त्य सेन यांनी केली.

कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागल्यामुळे देशातील सामान्य माणसांचे प्रचंड हाल झाले. या काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार या नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही देऊ शकलं नाही, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More