बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही लक्षणं दिसली तरी…’; केंद्राच्या राज्यांना सूचना

मुंबई | देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona Virus) डोकं वर काढलं आहे. पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही प्रमुख लक्षणं आढळल्यास नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचनाही पत्रात दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी राज्यांना पत्र पाठवली आहेत.  RTPCR चाचणीचा अहवाल मिळण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे राज्य सरकारने रॅपिड अँटीजन टेस्टचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर चाचण्यांचा वेग वाढवणंही गरजेचं आहे, असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात कोणत्या लक्षणं अधिक गंभीर आहेत, हे देखील सांगितलं आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जर कुणालाही खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, श्वास लागणे, अंगदुखी, चव अथवा वास घेण्यात समस्या, थकवा आणि जुलाब अशी लक्षण असतील, तर त्याला गांभीर्याने घेऊन त्याची चाचणी करणं आवश्यक आहे, असंही पत्रात सांगितलं आहे.

दरम्यान, देशात सध्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटने प्रवेश केला आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत विचार करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.

थोडक्यात बातम्या-

“त्याच्या छाताडावर उभं राहून…”, मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

31st निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

“तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता…”

सोनम कपूरची सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाली…

माझी ‘परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेशने शेअर केला जेनेलियाचा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More