बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

नवी दिल्ली | पेगॅसस साॅफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणावरून देशातील राजकारण तापलं होतं. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पेगॅसस प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली केंद्र सरकार देशातील विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सरकार याबद्दल काही सांगण्यास तयार नाही. केंद्र सरकार नेमकं काय लपवत आहे. सरकार आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मानत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्वोच्च न्यायालयाचं तरी ऐकायला पाहिजे. मोदी आता सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग ते कोणाचं ऐकणार आहेत. या शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. पेगॅसस प्रकरणानं आता देशातील राजकारणात पुन्हा राजकीय फटकेबाजी रंगली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील लोकांच्या खाजगी जीवनावर पाळत ठेवण्याचं काम केलं आहे. केंद्र सरकारने या प्रकरणावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयात नकार दिला आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम आदेश द्यावा लागला आहे.

थोडक्यात बातम्या 

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More