बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण; सरकार कुणाचं याचा विचार न करता केंद्राने मोठी आर्थिक मदत द्यावी”

मुंबई |  महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असल्याने केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत राज्याला दिली पाहिजे. कोणाचे सरकार आहे, याचा विचार करू नये, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते लोकसत्ताच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

मोदी सरकारने टाळेबंदी लागू करताना देशाला त्याची पूर्वकल्पना द्यायला हवा होता. म्हणजे देशातल्या नागरिकांना वेळ मिळाला असता. अडकलेले लाखो नागरिक घरी पोचू शकले असते, असं म्हणत केंद्राने घाईघाईत लॉकडाऊनचा निर्णय दाहीर केल्याचं चव्हाण म्हणाले.

राज्यात रुग्णसंख्या अधिक असताना व उत्पन्न बंद असताना केंद्राने मोठी आर्थिक मदत व पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय सामग्री द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

केंद्राने चर्चा न करता अचानक निर्णय जाहीर केला. अडकलेल्या लाखो लोकांची दीर्घकाळ सोय करणं सोपं नसतं. एक ते दोन आठवडे उत्साह असतो उत्साहाच्या भरात ते शक्यदेखील होतं. मात्र आता अडकलेल्यांचे हाल होत आहेत. परराज्यातील मजुरांकडचे पैसे संपत आले, असं सांगत रेल्वेने त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितले, ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. आता काँग्रेसकडून त्यांना आता मदत केली जात आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय

कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More