मुंबई | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता 1 महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीये. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय.
केंद्र सरकारने दिल्लीतील हे शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेतलं पाहिजे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले, “शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवं. नाहीतर सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिली तर ते चांगलं नसेल.”
पवार पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ही परिस्थिती देशासाठी चांगली नाही.”
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना
16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!
सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!
संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील
ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख
Comments are closed.