बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. अशातच केंद्र सरकारला फार काळ 150 रुपये प्रति डोस किमतीत ‘कोव्हॅक्सिन’ची लस देता येणार नसल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.

कोव्हॅक्सिन ही कोरोनाविरुद्ध वापरात आलेली पहिली भारतीय लस आहे. केंद्राला दिलेल्या दरामुळे खासगी क्षेत्रात किंमत वाढत आहे असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे फार काळ केंद्र सरकारला अल्पदरात लसींचा पुरवठा करता येणार नाही असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.

भारतात खाजगी क्षेत्रासाठी उपलब्ध अन्य कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुलनेत कोव्हॅक्सिनसाठी अधिक किंमत योग्य असल्याचे म्हटले आहे. कमी प्रमाणात खरेदी, वितरणाची जास्त किंमत आणि किरकोळ नफा यासारखी अनेक मूलभूत कारणे असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.

दरम्यान, भारत सरकारला प्रति डोस 150 रुपये दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा करणे ही स्पर्धा नसलेली किंमत आहे आणि हे दीर्घकाळ टिकून राहू शकत नसल्याचं कंपनीनं म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

ह्दयद्रावक! ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू

कोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद!

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस

‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More