नवी दिल्ली | केंद्र सरकार सातत्यानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक आकर्षक योजना (7th Pay Commission) घेऊन येतं. कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घर व्हावं हे स्वप्न असणाऱ्या सर्वांना सरकारनं गिफ्ट दिलं आहे.
घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात सरकारनं कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के व्याजदर करण्यात आला आहे. परिणामी घर बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत हे नवे व्याजदर लागू असणार आहेत. कर्मचारी आपल्या ईच्छेप्रमाणे घर बांधण्यासाठी काही रक्कम घेवू शकतात. तीन वर्षासाठी किंवा 25 लाख रूपये इतकी रक्कम घेता येते. 5 वर्षाची अस्थायी सेवा पुरवणारे कर्मचारी देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात.
दरम्यान, घर बांधकामासाठी पैसे देणाऱ्या सर्व व्यवस्थापकांना सरकारनं याबाबत निर्देश जारी केले आहेत. परिणामी केंद्रीय कर्मचारी आनंदात आहेत.
थोडक्यात बातम्या –
“खरे मास्टरमाईंड तर उद्धव ठाकरे”; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ
रावसाहेब दानवेंकडून महाविकास आघाडीला अमर, अकबर, अँथनीची उपमा, म्हणाले…
बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाची RSSला अडचण; वाद पेटण्याची शक्यता
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूमिपूजन संपन्न
नवाब मलिकांना मोठा दणका! तब्बल आठ मालमत्तांवर ईडीची टाच
Comments are closed.