बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वायु प्रदुषणाच्या समस्येवरून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

दिल्ली | देशभरात वायु  प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिल्लीमध्ये तर वायु प्रदुषणाने पातळी ओलांडली आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने लगेच पाउलं उचलत हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची बैठक बोलावली आहे.

आज सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला व राज्य सरकारला सुनावले होते. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजनांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दिल्लीमध्ये प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी 14 ते 17 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सर्व बांधकामाची कामे या काळात बंद असणार आहेत. सुप्रीम कोर्टाने लॉकडाऊन लावण्याचा देखील सल्ला सरकारला दिला आहे.

आज हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी प्रदुषण कमी करण्याच्या उपाययोजनांवर विचार केला जाणार आहे. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष एमएम कुट्टी आणि पर्यावरण सचिव आरपी गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More