बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं पहायला मिळालं होतं. मात्र ओबीसी आरक्षणाचा तिढा आता सुटणार आहे. कारण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारकडून मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायलयाच्या ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा आता सुटणार आहे.

ओबीसी आरक्षण रद्द करताना या प्रकरणाशी संबधित घटकांचे मत विचारात घेतले नसल्याचं सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे. यामुळे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावी , अशी याचिका केंद्र सरकार दाखल करणार आहे. शिवाय तर दुसरीकरडे राज्य सरकारची ट्रीपल टेस्ट पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकार राजकिय आरक्षणाची मागणी करणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायलयाने 15 डिसेंबरला 27 टक्के ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने 21 डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायत निवडणुका स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मात्र, न्यायालयाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळून लावली होती.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

MHADA पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ भाजप नेत्याला अटक

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More