बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून संसदेत केंद्राचा ‘यु-टर्न’

नवी दिल्ली | कोरोनाकाळात आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला होता. काही रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हता, तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय झाली होती. त्यातच रूग्ण दगावले नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. संसदेच्या अधिवेशनात विचारण्यात आलेल्या एका लेखी उत्तरात केंद्राने ही माहिती दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात होती. त्यातच आता केंद्र सरकारने यु टर्न घेतला आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत आंध्रप्रदेशात ऑक्सिजन अभावी काही रूग्णांचा मृत्यु झाला होता. काही रुग्ण व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. त्यात ऑक्सिजनच्या अभावी मृत्यु झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान मंगळवारी ही माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 9 ऑगस्टला आंध्रप्रदेश सरकारनं केंद्र सरकारला ही माहिती दिल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

आंध्रप्रदेशात काही रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील काही रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ऑक्सिजन टॅंक आणि बॅकअप सिस्टीममध्ये झालेल्या बिघाडामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि रूग्णांचा मृत्यु झाला, अशी माहिती केंद्राने दिली आहे. याआधी एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यु झाला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्र सरकार संसदेत खोटी माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनंतर संसदेत खासदारांनी संताप व्यक्त केला होता. खासदार मनोज झा यांनी संसदेत मन सुन्न करणारं भाषण देत केंद्र सरकारला झापलं होतं. तर काँग्रेस खासदारांनी देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता केंद्राने सांगितलेली आकडेवारी एक यु टर्न मानली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात येणार लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस

सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादमध्ये उपचार सुरु

“मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, मला बोलू द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं”

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवताना…; प्रीतम मुंडे, नवनित राणांचा शिवसेनेवर घणाघात

स्वपक्षातील खासदारामुळे भाजप अडचणीत, ‘या’ एका मागणीनं विरोधक आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More