बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ सुरुच; एकीकडे परीक्षा रद्द तर दुसरीकडे वेळापत्रक पोहोचलं

मुंबई | सायबर हल्ल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या सर्व परीक्षा 18 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या असून, त्या 19 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जारी केली आहे.

दुसरीकडे शुक्रवारी एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना 9 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरु होत असल्याचे वेळापत्रक विद्यापीठाने पाठवले. एकीकडे परीक्षा रद्द केल्याचे सांगितले व दुसरीकडे परीक्षेचे वेळापत्रक पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधत सिस्टिममध्ये आधीच रिमाइंडर सेट केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पोहचले आहे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More