बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, लायसन्सची गरज नाही… किंमत फक्त…

नवी दिल्ली |  हैदराबादमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप कंपनीने गेल्या वर्षी पहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बाईकचं नाव एटम 1.0 ठेवण्यात आले होते. भारतात गाडी लॉन्च झाल्यावर सुरुवातीची किंमत 50 हजार रुपये होती. इलेक्ट्रिक गाड्यांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. एटम 1.0 गाडीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. आता पर्यंत 400 गाड्या बुक झाल्या आहेत.

एटम ही कॅफे-रेसर शैलीची इलेक्ट्रिक बाईक आहे. गाडीचे पहिले १० युनिट ग्राहकांना देण्यात आले आहेत. इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव टेक्नोलॉजी  (आयसीएटी) व्यावसायिक वाहन म्हणून पूर्णपणे सुसज्ज, कमी वेगवान इलेक्ट्रिक दुचाकी वाहन म्हणून या मोटार सायकलला प्रमाणपत्र दिले आहे.

एटम 1.0 मध्ये एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी टेललाइट्स, एलईडी टर्न इंडिकेटर, स्टाइलिश कॅफे-रेसर डिझाईन, आरामदायक सीट, गो-फॅट फॅट टायर्स, 200 मीमी ग्राऊंड क्लीयरन्स आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ए डिजिटल डिस्प्लेचा समावेश आहे. सर्वसाधारण थ्री-पिन सॉकेट वापरुन ग्राहक कुठेही ही बाइक चार्ज करू शकतात. गाडी पुर्ण चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात.

एटम 1.0 इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये 48v, 250w इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. जे पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी पॅकसह जोडलेले आहे. एटम 1.0 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन एकाच चार्जवर जास्तीत जास्त १०० किमीची ड्राईव्हिंग करण्याचा दावा करते. त्याच वेळी, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 25 किमी प्रति तास गतीपर्यंत धावण्याची मर्यादा आहे.

या इलेक्ट्रिक बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे खरेदी केल्यावर याची नोंदणी करण्याची गरज नाही, तसेच त्या चालकासाठी त्याला ड्रायव्हिंग लायसन्सचीही आवश्यकता नाही. या बाईकचे एकूण वजन फक्त 108 किलो आहे. जी कोणत्याही वयोगटातील लोकं सहज वापरु शकतात.

थोडक्यात बातम्या-

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर

“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More