बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता संपलं वाट पाहणं!; नेक्सॅानपेक्षा कमी किंमतीत मिळणार टाटांची ‘ही’ नवीन SUV!

नवी दिल्ली | देशातील सर्वात वाहन उत्पादक टाटा मोटर कंपनीने देशातील सर्वात स्वस्त मायक्रो एसयुव्ही टाटा पंच देशातंर्गत बाजारात ग्राहकांसाठी सादर केली आहे. आतापर्यंत या कार एसयुव्हीमध्ये ‘एचबीएक्स’ असे नाव दिले जात होते. परंतु आता या कंपनीने पंच हे नवीन नाव देण्यास सुरूवात केली आहे. एसयुव्हीची कॉन्सेप्ट आवृत्ती कंपनीने गेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान सादर केली होती. त्यापासुन ही कार बाजारात कधी दाखल होईल, याची प्रतिक्षा ग्राहक करीत होते.

‘पंच’ टाटा मोटर ही पहिली एसयुव्ही आहे ती ‘एजाइल लाइट फ्लेक्सिबल एडवांस्ड आर्किटेक्चर’ याच्या आधारीत तयार केली आहे. एसयुव्ही इम्पॅक्ट 2.0 डिझाइन भाषेत विकसित करण्यात आली आहे.  या कंपनीने एसयुव्हीला कॉम्पॅक्ट लुक दिला आहे. जो तरूणांनाच्या आकर्षणाचा मुद्दा आहे.

लॉन्च होण्यापूर्वी कारच्या किंमती बद्दल माहिती सांगणे कठीण आहे, परंतु अहवालांमध्ये दावा केला जात आहे की कंपनीची किंमत 4 लाख ते 5 लाख रूपयांदरम्यान असु शकते. बाजारात ही मायक्रो एसयुव्ही प्रामुख्याने मारूती इग्निस आणि ह्युंदाईच्या आगामी छोट्या एसयुव्ही कॅस्परशी स्पर्धा करेल.

दरम्यान,  कंपनीने अद्यापही या एसयुव्हीच्या इंटीरियरविषयी कोणतीही माहिती शेअर केली नाही. परंतु काही तज्ञांचा असा विश्वास आहे की कंपनीला 7.0 इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, चौरस आकारात एसी व्हेंटसह तीन स्पोक फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,  डिजिटल टॅकोमीटर आणि अॅनालॉग स्पीडोमीटर देऊ जाऊ शकतं.

 

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांची नवी फेसबुक पोस्ट, सोशल मीडियावर जोरदार राडा!

अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, भाजपची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे मागणी!

नारायण राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

राणेंच्या जामीनानंतर दरेकरांनी सांगितला पुढचा कार्यक्रम, पाहा व्हिडीओ

“वरूण सरदेसाई यांना ‘सरकारी भाचा’ घोषित केलंय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More