बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | रिलायन्स जियो टेलिकाॅम क्षेत्रात आल्यापासु़न या क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडल्याचं पाहायला मिळालं. तसेच रिलायन्सने पदार्पण करताच मोठे बदल घडुन आले आहेत. त्यातच आता रिलायन्स जियोने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आणि धमाकेदार प्लान जियो वापरकर्त्यांसाठी आणला आहे.

जियोने 75 रूपयांचा प्लान ग्राहकांसाठी बाजारात आणला असून त्यामध्ये भारतातील सर्व क्रमांकावर अमर्यादित काॅल करता येणार आहे. त्याचबरोबर 3 जीबी डेटा मिळणार असून त्याची वैधता 28 दिवस असणार आहे. सध्या सुरू असलेल्या जियोच्या प्लानपैकी आता बाजारात आणलेला 75 रूपयांचा प्लान सर्वात स्वस्त असल्याचं बोललं जात आहे. तसेच यामध्ये बाय 1 गेट 1 ऑफरदेखील ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, रिलायन्स जियो कायमच आपल्या हटके आणि धमाकेदार ऑफरसाठी ओळखले जाते. त्यातच जियो फोन ऑल इन वन हा नवा प्लान ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लानला आता जियोचे ग्राहक नेमका कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच या प्लानप्रमाणेच स्पर्धेत असणाऱ्या इतर कंपन्याही काही ऑफर देणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागुन राहिलं आहे.

एअरटेल या कंपनीने आता आपला 49 रूपयांचा प्लान बंद केला असून ग्राहकांसाठी तोच प्लान आता 79 रूपयांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्या प्लानमध्ये अमर्यादित काॅल्सचीपण सुविधा नाही, त्यामुळे आता एअरटेलचे ग्राहक जियोकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी; कोकणातही पाऊस परतणार?

“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More